Top Ad unit 728 × 90

Aarogya Setu Application

आरोग्य सेतु अॅप्लिकेशन 
Aarogya Setu Application
आरोग्य सेतु अॅप्लिकेशन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येताच आपल्याला सूचित करणार - आरोग्य मंत्रालय  (NIC egov mobile App)

आरोग्य सेतु अॅप्लिकेशन माहिती व उद्दिष्ट
COVID-19 शी लढण्यासाठी  आरोग्य सेवा भारतातील लोकांशी जोडण्यासाठी भारत सरकारचे आरोग्य सेतु अॅप तयार केले आहे.

आरोग्य सेतू अॅप हा कोविड -19  विरुद्धच्या संयुक्त लढाईत अत्यावश्यक आरोग्य सेवा भारतीय लोकांशी जोडण्यासाठी हा अॅप भारत सरकारने विकसित केलेला मोबाइल अॅप आहे. COVID-19  च्या संबंधित माहिती व सल्लाांविषयी अलर्ट अ‍ॅपच्या वापरकर्त्यांना कृतीशीलपणे माहिती पुरविणे आणि त्यासंदर्भात भारत सरकारच्या, विशेषत: आरोग्य विभागाच्या पुढाकारांना वाढविणे हे अॅपचे उद्दीष्ट आहे.

आरोग्य सेतु अॅप्लिकेशन भारत सरकार आरोग्य मंत्रालय  (NIC egov mobile App) द्वारे लॉन्च करण्यात आले आहे. आता पर्यंत ह्या अॅप्लिकेशनचे खूप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड होत आहेत. ह्या अॅप्लिकेशनच्या वापरातून कोरोना पॉजिटिव्ह व्यक्तीच्या आपण संपर्कात आलो तर हे  अॅप्लिकेशन आपणास अलर्टद्वारे सूचित करते. आरोग्य सेतु अॅप्लिकेशन वापरामुळे आपण स्वतः सुरक्षित राहू शकतो तसेच इतरांना पण सुरक्षित ठेवता येते.

अॅप्लिकेशन कार्य प्रमाणली व आरोग्य संदेश:-

उपचारादरम्यान जर एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्यास, आरोग्य मंत्रालयाने सांभाळलेल्या रजिस्टरमध्ये संक्रमित व्यक्तीचा मोबाइल नंबर समाविष्ट केला जाईल आणि ही माहिती अ‍ॅपवरही अद्ययावत केली जाईल.  हे अॅप कोविड -19  संसर्गाच्या जोखमीचे आकलन करण्यासाठी आणि आवश्यक असल्यास संबंधित व्यक्ती किंवा प्रांताला अलग ठेवण्यासाठी वेळेवर पावले उचलण्यास सरकारला मदत करेल. अशी माहिती ज्वाइंट सेक्रेटरी लव अग्रवाल ह्यांनी दिली आहे.

अॅप्लिकेशन गोपनीयता:-
ह्या अॅपमधील वापरकर्त्यांची माहिती कोणाबरोबरही शेअर केली जाणार नाही आणि गोपनीयतेची पूर्णपणे काळजी घेतली जाईल असे सरकारने म्हटले आहे.



 अॅप्लिकेशन टेक्नॉलॉजी:-
 आरोग्य सेतुअॅप्लिकेशन मध्ये ब्लूटूथ टेक्नोलॉजी, एल्गोरिदम व आर्टिफिशियल इंटेलिजेंस चा वापर करण्यात आला आहे.  अॅप्लिकेशन एकूण 11 भाषांत उपलब्ध असून
आईओएस आणि अँड्रॉईड ह्या दोन प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आले आहे.



सायबर सेक्युरिटी अलर्ट:-
 तंत्रज्ञानाचा वापर आजच्या काळात खूप मोठ्या  प्रमाणत होत आहे. अनेक अॅप्लिकेशन वापर करतांना कोणते अॅप्लिकेशन फेक आहे की कोणते अॅप्लिकेशन लीगल आहे ह्या बद्दल अनेक प्रश्न सामान्य वापरकर्त्यांना येत असतात. इंटरनेटवर अनेक फेक लिंक अधिक प्रमाणत येतात ह्या मधून अनेकांची फसवणूक सुद्धा झालेली आहे. आरोग्य सेतु हे अॅप्लिकेशन सध्या आईओएस आणि अँड्रॉईड ह्या दोन प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आले असून ह्यांची प्रमाणित लिंक खालील प्रमाणे आहे.  इंटरनेटवरील सदैव प्रमाणित माहिती वाचल्याशिवाय इतर कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. आरोग्य सेतु अॅप्लिकेशन अँड्रॉईड वापरकर्त्यांनी डाऊनलोड करतांना (NIC egov mobile App) डेव्हलपमेंट लिंकचेच अॅप्लिकेशन डाऊनलोड करून वापर करावे.
Android युजरसाठी लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu

iOS युजरसाठी लिंक: itms-apps://itunes.apple.com/app/id1505825357

     सायबर सुरक्षा जनहित संदेश-
         वेबमास्टर लक्ष्मण वाठोरे
   


Aarogya Setu App Aarogya Setu App Aarogya Setu App Aarogya Setu App Aarogya Setu App Aarogya Setu App Aarogya Setu App Aarogya Setu App Aarogya Setu App Aarogya Setu App
Aarogya Setu Application Reviewed by Adarsh on 10:41 PM Rating: 5

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.